मंगळवेढा टाईम्स न्युज कंपनी ।
भारतीय जनता पक्षाकडून मंगळवेढा नगरपालिकेच्या सर्वसाधारण महिला गटात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून सुप्रिया जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे.

तर भाजपकडून इच्छूक असलेल्या तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला असून त्या स्वतंत्र पॅनल तयार करून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

समविचारी आघाडीकडून सुनंदा बबनराव आवताडे यांनी खासदार प्रणिती शिंदे, सिध्देश्वर आवताडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या विरोधात मोठी यंत्रणा कामाला लावली आहे.

माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्या पत्नी शुभांगी कोंडूभैरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

निवडणुकीत मोठा ट्विस्ट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी प्रभाग 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रमुख मातब्बराचे अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे नगरपालिकेत मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी इच्छुकांनी प्रभागात असलेल्या जेष्ठ मतदारांचा आशीर्वाद घेऊन वाजत गाजत शिवाय फटाक्याची आतिषबाजी करत नगरपालिकेत येत उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी या मार्गावर भेटलेल्या अनेक जाणकार व वरिष्ठ नेत्यांचे पदस्पर्श करून निवडणुकीत सहकार्य करण्याचे अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर मार्गावर असलेल्या देवी आणि देवतांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे कौल मागितला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










