मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग।
मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज भरण्यात सुरुवात झाली आहे, काल सोमवारी एकही अर्ज दाखल झाला नाही भाजप काही माजी नगरसेवकांना नारळ देणार असल्याने शहरांमध्ये राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सारीपाटावर हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांत उमेदवारांच्या यादीवर मंथन सुरू असून काही संभाव्य उमेदवारांनी तर आपली उमेदवारी निश्चित असल्याचा अंदाज धरून प्रचारयुद्धाची चुणूक दाखवली आहे.

भाजपमध्ये यंदा ‘नवे चेहरे, नवा आत्मविश्वास’ ही सूत्रे लागू होण्याची चिन्हे आहेत. माजी नगरसेवकांना थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात, यापैकी काही जणांना पक्ष ‘नारळ’ देणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

भाजप विरोधात विरोधकांची एकजूट अजून झालेले दिसत नाही त्यामुळे भाजप आता धक्का तंत्र वापराच्या तयारीत असल्यामुळे निवडणुकीत मोठी उलथापालत होणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांचे नाव पक्षाच्या नेत्यांनी गुप्त ठेवले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अर्ज दाखल होण्याची मुदत संपण्याच्या अगोदर अचानक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवेढा राजकारणात ‘धक्का तंत्र’ वापरले जाण्याची कुजबुज सुरू आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी भाजप कडून तेजस्विनी सुजित कदम हे एकमेव नाव चर्चेत आहे. भाजपच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप नगराध्यक्ष उमेदवार १,२०० मतांनी पराभूत झाला. त्याची सल भाजप नेते व कार्यकर्त्यांना आहे. मात्र गेल्या नऊ वर्षांत स्थानिक राजकीय समीकरणांत मोठे बदल झाले आहेत. सध्या भाजप आमदार आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता मिळण्याची अशा निर्माण झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











