टीम मंगळवेढा टाईम्स।
ग्रामपंचायत सदस्य व एका दूध डेअरीचे चेअरमन असलेल्या 31 वर्षीय तरुणाचा एका कार्यक्रमात डान्स करत असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावातून समोर येत आहे.

घरा शेजारी असलेल्या कार्यक्रमात डान्स करणाऱ्या 31 वर्षीय तरुणाला ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डान्स करताना अचानक कोळसला. काय घडले कोणालाच समजले नाही. त्यानंतर धावपळ उडली. अजित याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अजित कोंडीबा अनुसे (वय ३१ रा.कचरेवाडी ता.मंगळवेढा) असे मयत तरुण ग्रामपंचायत सदस्य व श्री समर्थ दूध डेअरी चेअरमन असलेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?
मयत अजित अनुसे यांच्या घरा शेजारी काल रविवारी रात्री संगीताचा कार्यक्रम सुरू होता. रात्री 12 च्या सुमारास अजित व त्याचा मित्र परिवार डान्स करत होते. पहिले काही मिनिटे मयत अजित डान्स करत होता. अजितला खांद्यावर घेऊन मित्रही नाचत होते.

परंतु त्यानंतर अचानक मित्राने अजितला खांद्यावरून खाली जमीन ठेकवल्यानंतर काही सेकंदातच अजित खाली कोळसला. काहीवेळासाठी नेमकं काय घडलं हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते.

लगेच त्याला रुगणालयात नेण्यात येते मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झासल्याचे सांगताच सर्वांनाच धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टर सांगतात. क्षणातं होत्याचं नव्हतं झालं, संपूर्ण कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला.
हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच या घटनेने कचरेवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










