मंगळवेढा टाईम्स ; संपादक – समाधान फुगारे
मंगळवेढा नगरपालिका निवडणूकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष, नेते, स्थानिक आघाड्यांचे प्रमुख कामाला लागले आहेत. इच्छुकांची नेत्यांकडे धावपळ सुरु झाली आहे.
कोण कुठून लढणार? कोण कोणाविरुद्ध दंड थोपटणार? आघाडी-महायुती की स्थानिक आघाड्यांत लढत रंगणार यावर सध्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रशासनच नगरपालिकेवर कारभार करत असताना पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे. अनेक नव्या-जुन्या चेहऱ्यांचा उगम अन् अस्त देखील होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप कडून तेजस्विनी सुजित कदम व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सुप्रिया अजित जगताप व सध्या शहरभर पाय रोवू पाहणारा समविचारी आघाडी गट हे निवडणुकीतील तगडे प्रतिस्पर्धी असतील असे चित्र आहे.

नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण असल्याने लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळतो यासाठी सध्या मोठी रस्सीखेच दिसून येत आहे.

भाजपकडून तेजस्विनी कदम, राष्ट्रवादीकडून सुप्रिया जगताप, तसेच समविचारी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असण्याची शक्यता असून यामध्ये अनिल सावंत, राहुल शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील यंदा फॉर्म मध्ये असून तो स्वतंत्र ताकद आजमाविणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्याकडून तसे स्पष्ट संकेत देखील देण्यात आले आहेत. ऐनवेळी कोणाची युती-आघाडी कोणाशी होईल हे सांगता येत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांत एकमेकांचे पारंपारिक विरोधक देखील आपापसात युती करतात हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे इच्छुक जरा जपूनच आपली प्यादी पुढे सरकवून अंदाज घेत आहेत. शेवटी कोणाशी कोण युती करतो? यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

भाजप कमळ चिन्हावर निवडणूक लढणार
भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे हे असल्यामुळे नगरपालिका निवडणूक भाजप कमळ चिन्हावर लढवणार आहे, त्यामुळे मित्र पक्ष कोणती भूमिका घेतात हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

प्रस्थापितांच्या घरात जाणार नगराध्यक्षपदाची उमेदवारी?
नगराध्यक्ष पदासाठी काही नावांची चर्चा सध्या चालू आहे. त्यामध्ये आवताडे गटाकडून तेजस्विनी कदम, जगताप गटाकडून सुप्रिया जगताप किंवा आणखी काही नावे चर्चेत आहेत. यंदा नगरसेवकांची संख्या दोन ने वाढल्याने इच्छुक आपापली फिल्डिग लावण्यात व्यस्त दिसून येत आहेत. तर राजकीय गटात गुप्त बैठका चालू असल्याचे समजते.

काँग्रेसने दिला स्वतंत्र लढण्याचा इशारा
काँग्रेस पक्ष नगरपालिका निवडणूक आपल्या मित्र पक्षासोबत मिळून लढवेल असे वाटत आहे बोलणी फिस्कटली तर काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवेल असे बोलले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










