टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अतिवृष्टीचे ८४ कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. तालुक्यातून शेतकऱ्यांची अनुदानित ट्रॅक्टरसाठी निवड झाली असून ७३०० लाभार्थी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी निवड झाली आहे.

अशाप्रकारे यांत्रिकीकरण योजनेंतर्गत तालुक्यातून १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत १२१ ट्रॅक्टरचे वितरण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष प्रकाश आप्पा गायकवाड, दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर, शहराचे नेते अजित जगताप, जकराया शुगरचे सचिन जाधव उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात ड्रोन उडवण्यावर प्रशासनाची बंदी
कार्तिक वारी यात्रा कालावधीत पंढरपूर व अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार, जिल्हा प्रशासनाने संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, पंढरपूर व श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांभोवती ड्रोन घडवण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

ही बंदी २७ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील ६० दिवस लागू राहणार आहे. यात्रा कालावधीत स्लीपर सेल सक्रीय होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली.

सर्व ड्रोन परवाना चालकांनी त्यांच्या ताब्यातील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












