मंगळवेढा टाईम्स : संपादक – समाधान फुगारे (7588214814)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद,सोलापूर आयोजित कराटे, कुस्ती, मैदानी, खो- खो या क्रीडा स्पर्धामध्ये उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलने यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण करत यश संपादन केले.
त्यामध्ये कराटे स्पर्धेत अबू सुफियान समीर तांबोळी (वजन गट ५५) प्रतीक दत्तात्रय कांबळे (वजन गट ५०) लक्ष्मी कुंडलिक पवार (वजन गट ४०) यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व विभागीय स्तरासाठी त्यांची निवड झाली.
मिसबा समीर तांबोळी (वजन गट ५६) जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला. प्रथमेश सचिन कोरे (वजन गट ४५) याचा तालुकास्तरीय तिसरा क्रमांक आला.
समर्थ निलेश बिराजदार (११० वजनगट, १७ वर्ष) याने कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक मिळवला. मैदानी स्पर्धांमध्ये विराज सुदर्शन बर्गे (14 वर्षे वयोगट, मुले) पोल वॉल (बांबू उडी) यात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय साठी त्याची निवड झाली.
कुणाल बाबासाहेब कोळसे (१७ वर्षे वयोगट, 400 मीटर धावणे) हर्डलस (अडथळा) तालुकास्तरीय तिसरा क्रमांक मिळवून जिल्हास्तरीयसाठी निवड झाली. त्याचप्रमाणे प्रशालेतील खो-खो च्या टीमने (१७ वर्ष मुले )तालुकास्तरीय तिसरा क्रमांक मिळवला.
प्रशालेतील सर्व विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या खेळले. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन सन्मान व कौतुक केले.
या सर्व स्पर्धकांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक इर्शाद सनदी सर व प्रियंका विभुते आणि कराटे प्रशिक्षक गणेश बंडु जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मंगळवेढा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे विश्वस्त व मार्गदर्शक डॉ.नंदकुमार शिंदे व स्त्रीरोगतज्ञ डॉ.पुष्पांजली शिंदे यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज