मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे हजारो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या संकटाच्या काळात नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील हिराबाई डांगे या लाडक्या बहिणीने आपल्या अनोख्या दातृत्वातून मदतीचा हात पुढे केला आहे.
मंगला डांगे यांनी आपल्या लाडक्या बहिणीचे दहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहे. रकमेचा धनादेश आमदार समाधान आवताडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, दत्ता साबणे हे यावेळी उपस्थित होते.
हिराबाई डांगे यांच्या या स्तुत्य कार्याचे कौतुक होत आहे. हिराबाई डांगे या भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांच्या मातोश्री आहेत.
आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे.
या अनोख्या दातृत्वामुळे हिराबाई डांगे या जिल्ह्याच्या ‘लाडक्या बहिणी’ म्हणून पुढे आल्या आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांनी पुढे येण्याची गरज असताना, हिराबाई डांगे यांचं हे पाऊल प्रेरणादायी ठरत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज