मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील ३२ जिल्हा परिषदांचे गट व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या गणांसाठी १३ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर तब्बल ४४ व्या दिवशी आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
गट व गणासाठी सोमवारी दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीसाठी असलेली १९९६ ची नियमावली शासनाने रद्द केली आहे. ग्रामविकास विभागाने २० ऑगस्टला नवी नियमावली केली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरताक्रम केला जाणार आहे.
नव्या नियमावलीनुसार होणारी ही पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीसाठी आरक्षणाची सुरवात शुन्यापासून होणार आहे. अनुसूचित जाती व जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले गट व गण अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव होणार आहे.
जिल्ह्यातीलील अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव केल्या जाणाऱ्या गट व गणांचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी सोमवार दि.६ ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्तांना पाठविणार आहेत. या प्रस्तावाला विभागीय आयुक्त दि.8 बुधवारपर्यंत मान्यता देणार आहेत.
अनुसूचित जाती/जमातीसाठी राखीव झालेल्या गटातून निम्मे गट या प्रवर्गातील महिलांसाठी चिठ्ठीद्वारे निवडले जाणार आहेत. अनुसूचित जाती/जमातीचे गट वगळून उर्वरित गटातून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्क्यांप्रमाणे गट व गण राखीव केले जाणार आहेत. त्यातून ओबीसी महिलेसाठी चिठ्ठीद्वारे निम्मे गट राखीव केले जाणार आहेत.
एससी, एसटी, ओबीसी आरक्षण झाल्यानंतर उर्वरित गटातून निम्म्या गटांसाठी चिठ्ठीद्वारे सर्वसाधारण महिलेचे आरक्षण काढले जाणार आहे. चिठ्ठ्या काढून राहिलेले गट सर्वसाधारण असणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे.
असा आहे सोडतीचा कार्यक्रम
आरक्षण सोडत : १३ ऑक्टोंबर
आरक्षणावर दावे व हरकती : १४ ते १७ ऑक्टोंबर
हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्तांना अभिप्राय : २७ ऑक्टोबरपर्यंत
आरक्षण अंतिम करणे : ३१ ऑक्टोंबर
अंतिम आरक्षणाची राजपत्रात प्रसिध्दी : ३ नोव्हेंबरपर्यंत
सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटाची विभागणी
एकूण जागा : ६८
अनुसूचित जमातीसाठी : ०१
अनुसूचित जातीसाठी : १० (निम्म्या जागा महिलांसाठी)
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) : १८ (निम्म्या जागा महिलांसाठी)
सर्वसाधारण महिलांसाठी : २०
सर्वसाधारण : १९
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज