मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
चडचण (कर्नाटक) येथील स्टेट बैंक शाखेतील मंगळवारच्या दरोड्यातील २० किलो सोने एका बॅगमध्ये हुलजंती येथील एका पडक्या घराच्या पत्र्यावर काल गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास सापडले.
कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळी ग्रामस्थांची हुलजंती येथे बैठक घेऊन दरोड्यातील मुद्देमाल कोणाच्या हाती लागला असेल तर पोलिसांच्या स्वाधीन करा.
अन्यथा पोलिसांच्या तपासणीत आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा दम भरला होता. दरम्यान पोलिस एका इमारतीवरून पाहणी करताना पडक्या घराच्या पत्र्यावर बॅग आढळली.
चडचण येथील विजयपूर-पंढरपूर मुख्य रस्त्यावर असणाऱ्या स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास ५ दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून अंदाजे २ कोटी रोख रक्कम व २० किलो सोने असा २१ कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटला होता.
दरोडेखोर हे महाराष्ट्राच्या दिशेने आल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी पोलिसांना सतर्क केले होते. चडचण येथे घटना घडल्यानंतर एका दरोडेखोराने रात्री ८:१५ च्या सुमारास हुलजंती येथे कारने (केए २४ डीएच २४५६) गावातील तरुणास धडक दिल्यामुळे लोक या कारचा पाठलाग करीत होते.
चालकाने गावातील एका वस्तीत गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला. रस्ता नसल्याने गाडी पाठीमागे घेऊन पिस्टल दाखवून, दोन बॅगा घेऊन जंगलात पळून गेल्याचे नागरिकांनी सांगितले होते.
पंचनामा करुन सोने, मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन
कर्नाटक व मंगळवेढा पोलिसांच्या पथकाला शोध मोहिमेत दरोडेखोराची गाडी ज्या ठिकाणी सापडली तेथून २०० ते ३०० मीटर अंतरावरील एका पडक्या घराच्या पत्र्यावर बॅग आढळून आली. सोन्याच्या पाकिटाने भरलेली मुद्देमालाची बॅग ही खालच्या बाजूने पावसाने भिजलेली होती. बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण शाखेतील सोनेतारणाचे पाकिटे आढळून आली.
जवळपास २० किलो सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. घटनास्थळाचा पंचनामा स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी यांच्या समक्ष केला. सोने मुद्देमालाची मोजदाद झाल्यानंतरच सोने व मुद्देमाल कर्नाटक पोलिस जाहीर करणार आहेत.
बैठकीनंतरच बॅग तेथे कोणी आणून ठेवली? पोलिसांसमोर मोठा प्रश्न…
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास हुलजंती गावातील समाज मंदिरामध्ये संयुक्त पोलिस पथकाने ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी विजयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हत्ती, मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे,
चडचणचे सीपीआय सुरेश बेंडेगुंवाळ, पोलिस निरीक्षक दत्तात्रय वोरीगिड्डे, पोलिस पाटील जिवाजी सोनवले, पोलिस नाईक सचिन वनकर, पोहेकों विक्रम काळे, पोहेकॉ प्रमोद मोरे यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले होते. बैठकीनंतर ही बॅग सापडल्यामुळे ती या ठिकाणी अज्ञाताने आणून ठेवली काय ? हे दरोडेखोरांचा शोध लागल्यानंतरच निष्पन्न होणार आहे.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज