टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे पाण्याची मोटर चालू करण्याकरिता गेलेल्या ३२ वर्षीय तरुणास इलेक्ट्रीक शॉक लागून मयत झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील मयत आण्णासाहेब उर्फ राजू ज्ञानेश्वर चेळेकर (वय ३२) हा तरुण दि.१८ रोजी पहाटे ५ वाजता घरातील दरवाज्याच्या पायरी जवळी पाण्याची मोटर चालू करण्याकरिता गेल्यावर शॉक लागून मयत झाला आहे.
याची खबर सुरेश चेळेकर यांनी पोलीसात दिल्यावर या घटनेची नोंद पोलीसात झाली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार व्हरे हे करीत आहेत.
शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी
दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जमीन ओली झालेली असल्यामुळे विदयुत मोटर चालु करताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा लाख मोलाचा जीव बळी जावू शकतो.
जमीन ओली झाल्यामुळे विजेचा प्रवाह तात्काळ शरीरात उतरत असल्याने शेतकरी व नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज