मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कमी दरात सोने देतो म्हणून जत येथील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेला एका ठिकाणी बोलवून मारहाण करण्याची भीती दाखवून २ लाख २५ हजार रुपयांना लुटल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यापैकी दोन आरोपी शरद जाफर पवार (वय ३५) व त्यांची पत्नी सोनी शरद पवार (वय ३०, रा. सिद्धापूर ता. मंगळवेढा) यांना पकडण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले.
बुधवारी त्यांना अटक करून काल गुरुवारी मंगळवेढा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेघा माळी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी महिला ही सांगली जिल्ह्यातील जत शहरातील हॉटेल व्यावसायिक आहे. हॉटेलात कामास येत असलेल्या महिलाच्या नात्यातील गुड्डू नावाच्या मुलाशी ओळख झाली होती.
फिर्यादी महिला व तिचा दीर प्रथमेश हांडे हे सोने घेण्यासाठी भालेवाडी गावाजवळ गेले. तेव्हा फिर्यादी व दीराकडील २ लाख रुपये,
हातातील चांदीचे ब्रासलेट व १० हजार रुपये किमतीची गळ्यातील चांदीची चैन असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचे मुद्देमाल जबरीने मारहाण करुन काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मंगळवेढा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेघा माळी यांच्या न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील अॅड.अमोल क्षीरसागर यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर दोघांना २४ पर्यंत कोठडी मिळाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज