मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पलूस आणि आष्टा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरणारे दोन अट्टल चोरटे पकडण्यात विटा पोलिसांना यश आले. अजित श्रीरंग चन्ने (रा. वलखड, ता.खानापूर) व संकेत तानाजी ढगे (निंबोणी, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून 1 लाख 79 हजार 900 रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. याबाबत धनंजय बाबासाहेब शिंदे (विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली होती.
विटा शहरातील सांगली रस्त्यालगतच्या एका पेट्रोल पंपामागून 2 ऑगस्टरोजी मध्यरात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद धनंजय शिंदे यांनी दिली होती. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकातील हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख यांना विटा-खानापूर रस्त्यावरील हद्दीत दोघे चोरीच्या दुचाकीवरून फिरत असल्याची टीप मिळाली.
गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अजित चांदणे आणि संकेत ढगे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीविषयी चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विटा, आष्टा, पलूस येथून पाच दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीचा आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक फडतरे यांनी सांगितले.
ही कारवाई अमोल पाटील, उत्तम माळी, किरण खाडे, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, राजेंद्र भिंगारदेवे, चंद्रसिंग साबळे, हरी शिंदे, अमोल कदम, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सतीश आलदर, करण परदेशी, अभिजित पाटील, अजय पाटील यांनी केली.
सोलापुरात मोटारसायकल चोरणार्या तिघांना पकडले
सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरणार्या तिघांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकलीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून, मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पसारे वस्ती रस्त्यावर चोरीची मोटारसायकल घेऊन थांबलेल्या सैफन नरूद्दीन बागवान (वय 30, रा. किसान नगर, सोलापूर) याला अटक केली. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या.
सोलापूर मार्केट यार्ड, मंगळवेढा येथून या मोटारसायकली चोरल्या होत्या.
अक्कलकोट रोडवरील किसान नगर जवळ गणेश ज्ञानबा कांबळे (वय 30, रा. तुळजाभवानी नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या.
विडी घरकूल आणि सीएनएस हॉस्पिटल येथून या मोटारसायकली चोरल्या होत्या. याबरोबर एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन, नेताजी सुभाष चंद्र बोस बगीच्या समोरील सार्वजनिक रस्त्याचे ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार तेथून गणेश मल्लीनाथ स्वामी (वय 20, रा. सर्वोदय नगर मुळेगांव रोड, सोलापूर) त्याच्याकडून मिल्लत मशीद येथून चोरी केलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सहा गुन्ह्यातील एक लाख 55 हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज