मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गौण खनिजापैकी दगड, वाळू, मुरुम, खडी यासह अन्य गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात आणण्यात आले आहेत.
तरीही अनेक ठिकाणी अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने महसूल मंत्र्यांनी नुकतीच या संदर्भात बैठक घेऊन असे प्रकार करणाऱ्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे यापुढे गौण खनिजाची अवैध वाहतूक करीत असाल तर खबरदार, असा इशाराच प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
अवैध गौण खनिजामुळे शासनाच्या महसुलावरही विपरित परिणाम होत आहे. यासाठी महसूल मंत्र्यांनी या संदर्भात एक बैठक घेऊन कारवाईचे निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावामध्ये अवैध गौण खनिजाची वाहतूक व उत्खननावर निर्बंध आणण्यासाठी आता कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन अथवा वाहतूक करताना आढळून आल्यास त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ दंडात्मक कारवाई तसेच भारतीय न्याय संहिता व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार थेट फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार नीलेश पाटील यांनी दिले आहेत.
त्यामुळे यापुढे गौण खनिज वाहतूक व उत्खनन करताना रितसर परवानगी घेऊन करावी तसेच त्यासाठी शासनाच्या वतीने आकारण्यात आलेल्या शुल्काचा भरणा करुन कायदेशीर नियम व अटीच्या अधिन राहून वाहतूक करावी, असे आवाहनही तहसीलदार पाटील यांनी केले आहे.
त्यामुळे यापुढे जर अवैध गौण खनिजाची वाहतूक करताना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज