मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कोविड १९ च्या लसीचा आणि अचानक झालेल्या मृत्यू याचा काहीही संबंध नाही, असे आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि दिल्लीच्या एम्सने केलेल्या व्यापक अभ्यासात स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हासन जिल्ह्यात हदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंचा कोविड १९ लसीशी संबंध असल्याचे म्हटले होते. लसीला घाईघाईत मंजुरी देणे आणि लसीकरण करणे हे मृत्यूचे कारण असू शकते, असा दावा त्यांनी केला होता.
त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील अनेक संस्थांनी अचानक आणि अस्पष्ट कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे.
आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (एनसीडीसी) केलेल्या अभ्यासानुसार भारतातील कोविडच्या लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. गंभीर दुष्परिणामांची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत.
अचानक हार्ट अॅटॅकमागे अनेक कारणे : केंद्र सरकार
अचानक हदयविकाराच्या झटक्यामागे आनुवंशिकता, जीवनशैली, पूर्वीचे आजार, कोविडनंतरची गुंतागुंत आदी कारणे असू शकतात. आयसीएमआर व एनसीडीसी १८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूंचे कारण कळण्यासाठी अभ्यास करीत आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज