mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 16, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

टीम मंगळवेढा टाईम्स । संपादक : समाधान फुगारे (7588214814)

धनश्री मल्टिस्टेट बँकेने अल्पावधीतच बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले आहे. ते आंधळगाव येथे धनश्री मल्टिस्टेट या वास्तूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समाधान आवताडे हे होते.

व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा.डॉ.लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, शिवसेना नेते प्रा.शिवाजीराव सावंत, चेअरमन शोभाताई काळुंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आष्टी शुगर सुयोग गायकवाड,

माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,  सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, मंगळवेढा निबंधक व्ही. व्ही.वाघमारे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी चेअरमन शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, माजी आमदार धनाजी साठे, संचालक दिगंबर भाकरे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय अधिकारी कुंदन भोळे

भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,  दामाजी शुगरचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लतीफ तांबोळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, शिवाजी नागणे, राष्ट्रवादीचे अँड. शिवानंद पाटील,

शिवसेनेचे प्रा.येताळा भगत, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, शिवसेना (शिंदे गटाचे) तालुकाप्रमुख अशोक चौंडे, मंगळवेढा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांचेसह आंधळगाव परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने नियम घालून दिलेल्या नियमानुसार धनश्री बँकेने कामकाज केले आहे. नविन टेक्नॉंलॉजीचा वापर धनश्री बँक काम करत असून नागरिकांना जलद सेवा मिळत आहेत.

आजपर्यंत 2 हजार कोटी ठेवी केवळ प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्यावर असलेल्या विश्वासावर ठेवी ठेवल्या असून कर्ज वाटप देखील योग्य प्रकारे करून 100 टक्के वसुली देखील केली जात आहे. नागरिकांनी अधिक जास्तीतचे व्याज घेण्यापेक्षा आपला पैसे कोठे सुरक्षित आहे. त्या बँकेत ठेवी ठेवल्या पाहिजेत असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.

राज्य बँक रोखणार नागरी, बँकांवरील सायबर हल्ले

सध्या सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांबरोबरच बँकांनाही मोठ्या प्रमाणात लुटले जात आहे. त्यामुळे राज्य बँक आणि नागरी, जिल्हा बँकांच्या सुरक्षिततेसाठी सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही नवी प्रणाली सुरू केली जाणार आहे. सायबर हल्ल्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन त्याचे परिणामकारक नियंत्रण करणे आणि असे हल्ले परतवून लावणे तसेच संभाव्य धोक्याच्या सूचना बँकांना देण्याचे काम या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे

आमदार समाधान आवताडे बोलताना म्हणाले की, धनश्री परिवाराने सुरुवातीचा खडतर प्रवास करत मोठ्या दिमाखात बँक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी नावारूपाला आणली आहे. दुष्काळी भागात बँक सुरू करून आंधळगाव शाखेने 70 कोटी ठेवी ठेवल्या आहेत जे खूप कौतुकास्पद आहे.

धनश्री परिवाराने नागरिकांचा विश्वास संपादन करून 2 हजार कोटी ठेवी बँकेकडे आहेत. ठेवी मिळणे खूप सोपे असून चांगले कर्जदार शोधून त्यांना कर्ज देऊन 100 टक्के वसुली करणे काय असते ते धनश्री बँकेकडून शिकले पाहिजे. योग्य व्यक्तीला कर्ज देऊन 100 टक्के वसुली होणे खूप गरजेचे आहे.

प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी सांगितल्या प्रमाणे लवकरच पाणी मिळणार आहे.  मंगळवेढा उपसा सिंचन योजना 700 कोटींची असून पहिला टप्पा पूर्ण होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील टेंडर सुद्धा निघणार आहे. अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणे खूप अवघड होते. 1996 साली धनश्री सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करत आहोत. धनश्री महिला व मल्टिस्टेट बॅंकेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब नागरिकांना मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.

सण 1972 चा दुष्काळ मी पाहिला असून शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी पाणी परिषद स्थापन करून पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. दुष्काळी भागासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी प्राधान्याने लक्ष देऊन पूर्ण करावी असे आवाहन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ व इंद्रजित घुले यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री मल्टिस्टेट बँक मंगळवेढासहकारमंत्री बाबासाहेब पाटील

संबंधित बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार ‘गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

June 10, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Next Post
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा... भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

ताज्या बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..