mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गोव्याहून आलेल्या विमानाच्या सोलापुरात लैंडिंगपूर्वी 3 घिरट्या, प्रवाशांची घालमेल; विमान कंपनीने सांगितले ‘हे’ कारण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 14, 2025
in सोलापूर
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्लाय ९१ च्या गोवा फ्लाइटच्या वैमानिकांनी शुक्रवारी सजगता दाखवली. गोव्यावरून थेट आल्यानंतर विमानतळावर लैंडिंग न करता विमानतळ भोवतालच्या २० किलो मीटर परिघात तीन वेळा घिरट्या घातल्या.

त्याने प्रवाशांत घालमेल वाढली. मात्र, काहीही धोका नसल्याचे वैमानिकाने सांगताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वैमानिकाने घिरट्या घालून परिसरातील इमारती, झाडे, कारखान्यांच्या धुराड्यांचा अभ्यास केला. संपूर्ण निरीक्षण नोंदवून अर्ध्या तासानंतर विमान सोलापूर विमानतळावर उतरले.

फ्लाय ९१ चे विमान गोव्यावरून काल शुक्रवारी नियोजित वेळेत सोलापूरसाठी निघू शकले नाही. सकाळी ८.३० वाजता येणारे विमान अडीच तास उशिराने सोलापुरात पोहोचले. प्रतिकूल हवामानाचे कारण कंपनीने दिले.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टेकऑफसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विमानाने उड्डाण केले. ते ११ वाजण्याच्या सुमारास सोलापुरात पोहोचले. त्यानंतर विमानतळाच्या भोवताली असलेल्या कुंभारी, देड्डी, बक्षीहिप्परगे, सोरेगाव, हत्तुर या गावांच्या परिसरात विमानाने तीन घिरट्या घातल्या.

विमान हवेतच घिरट्या घालत असल्याने सोलापूरकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती. तासभर त्याचीच चर्चा सुरू होती. सुमारे अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर ते साडे अकराच्या सुमारास विमानतळावर लैंड झाले.

सोमवारी आणि शुक्रवारी गोव्यातून सकाळी ७.३० वाजता निघून सोलापुरात ८.३० वाजता पोहोचण्याची विमानाची वेळ आहे. पण शुक्रवारी उशीर झाला.

२० किमी परिघात वैमानिकांकडून विमानतळ भोवतालचे निरीक्षण

परिस्थितीचा आढावा घेतला

विमानसेवेच्या शुभारंभ दिवशी वैमानिकांना परिसराची पाहणी करता आली नव्हती. त्यामुळे वैमानिकांनी परिसरात तीन वेळा फेरी मारून विविध कारखान्यांची धुराडे आणि इमारतींचा अभ्यास केला. संपूर्ण निरीक्षण नोंदवल्यानंतर विमान विमानतळावर सुखरूपपणे लॅण्ड झाले.’ अंजनी शर्मा, व्यवस्थापक, सोलापूर विमानतळ

अडीच तास तास उशिरा झाले

खराब हवामानामुळे गोव्यावरून सकाळी ८.३५ येणारे विमान सोलापूरला ११.१० वाजता म्हणजे अडीच तास उशिरा आले. काही महिला प्रवासी जाण्यासाठी गोव्याहून विमानाने आल्या. तर काही सोलापूरकर गोव्याहून परतले. शनिवारी विमान सायंकाळी ४.०५ वाजता गोव्याहून निघेल ५१० वाजता सोलापुरात येईल.

धावपट्टीपासून अपेक्षित उंचीचा वेध घेतला

सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर विमानतळावर लॅण्ड करण्यासाठी विमानाची धावपट्टीपासून उंची किती असावी, याचा अंदाज वैमानिकांनी घिरट्या घालताना बांधला. अपेक्षित योग्य उंची राखण्यासाठी वैमानिकांनी निरीक्षण केल्याचे सांगण्यात आले.

५१ प्रवाशांना घेऊन आले गोवाहून सोलापूरला

गेलेले फ्लाय ९१ चे IC 1402 हे विमान ५१ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी सकाळी सोलापूर विमानतळावर उतरले. सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे ढग कमी होते. कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि विमान सुरक्षितपणे उतरवले.

व्हिज्युअल सर्किट आणि गो-अराउंड अॅप्रोच घेत परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर हे करण्यात आले. आमचे कर्मचारी डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उच्च प्रशिक्षित आहेत. नियमांचे पालन करतात. प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता आहे. पावसाळ्यात वारे, पाऊस आणि ढग कमी असल्याने हवामानाची परिस्थिती अनेकदा वेगाने बदलत असते. त्यामुळे खबरदारी घेण्यात आली.- मनोज चाको, सीईओ, फ्लाय ९१ एअरलाइन्स(स्रोत; दिव्य मराठी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विमानतळ

संबंधित बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कामाची बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार पालिका निवडणुका 'या' महिन्यानंतरच

ताज्या बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 30, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा