टीम मंगळवेढा टाईम्स ।
जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ स्थापन केलेल्या सि. बा. यादव प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्यावतीने सन २०१६ पासून गळवेढा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधून एस. एस. सी. परीक्षेत प्रथम येणा-या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येतो.
त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
यावर्षीचा ‘कृतिशील मुख्याध्यापक’ पुरस्कार उदयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, मंगळवेढाचे सुधीर अंबादास पवार यांना जाहीर झाला असून सुहास कमलाकर रत्नपारखी (हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर),
प्रमोद मुरलीधर जालगिरे (विद्यामंदिर हायस्कूल, लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा)
व नवनाथ पंढरीनाथ सावत (कै. सौ. लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला, मंगळवेढा) यांची ‘गुणवंत शिक्षक पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक ०७ जून, २०२५ रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे वैजनाथ महाजन (ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते, सांगली) यांच्या शुभहस्ते व
दत्तात्रय जमदाडे (व्हा. चेअरमन, मंगळवेढा लोकमंगल पतसंस्था, मंगळवेढा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून
या कार्यक्रमासाठी नंदकुमार पवार (माजी सभापती, पंचायत समिती, मंगळवेढा), चंद्रकांत होनमाने (निवृत्त सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता), राजेंद्र नलवडे (सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, पुणे विभाग) व
वसंत गरंडे (संस्थापक अध्यक्ष, चेतना बहुउद्देशीय संस्था, नंदेश्वर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी व साहित्यप्रेमीं बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज