मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरात बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून, त्याद्वारे जादा परताव्याचे अमिष दाखवून सोलापुरात माजी नगरसेवकाच्या मुलासह तब्बल १२४ जणांना १५ कोटी ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.
बार्शीतील विशाल फटे याने तब्बल १२९ पेक्षा जास्त लोकांना २५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावला होता. सोलापुरातील या प्रकरणामुळे बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.
या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता.
आशिष अशोक पाटील (वय २५, रा. न्यू संतोष नगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात निवृत्ती पैलवान व त्याची पत्नी सुरेखा पैलवान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
निवृत्ती पैलवान याने माजी नगरसेवक पुत्र आशिष पाटील यांना पाच टक्के दराने परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पैलवान याने त्यांच्याकडून वेळोवेळी ८० लाख रुपये घेतले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा दिला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे आशिष अशोक पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात निवृत्ती पैलवान व त्याची पत्नी सुरेखा पैलवान यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती.
त्या तक्रारीनुसार पैलवान पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता. मात्र, या गुन्ह्याची व्याप्ती वाढू लागल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
निवृत्ती पैलवान याने एकूण 124 ठेवीदारांकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 15 कोटी 40 लाख रुपयाची फसवणूक केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पैलवान हा बेपत्ता होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याच्या पत्नीनेही तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. तो गुरुवारी (ता. २०) पोलिसांना शरण आला. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१ फेब्रुवारी) त्याला विशेष सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज