मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आपल्या मोबाईलवर आलेला एक मेसेज पाहून डॉक्टरांना प्रचंड धक्का बसला, हा मेसेज होता सासुला वैतागलेल्या एका सुनाचा. या मेसेजमध्ये सासुला मारण्यासाठी कोणतं औषध देऊ असं डॉक्टरांना विचारण्यात आलं होतं.
ही घटना बंगळुरूमधील आहे. संबंधित महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासुला मारण्यासाठी डॉक्टरांकडे औषधाची विचारणा केल्याचा आरोप या सुनेवर आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं डॉक्टरांना मेसेज केला की माझ्या सासुला मारण्यासाठी कोणतं औषध देऊ, त्यानंतर घाबरलेल्या डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ज्या डॉक्टरांना मेसेज आला त्या डॉक्टरांचं नाव सुनील कुमार हेब्बी असं आहे. त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मला एक मेसेज आला.
ज्याने मला मेसेज पाठवला त्याने आधी फक्त हायचा मेसेज पाठवला होता. त्यानंतर मी पण रिप्लाय दिला. त्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात. तेव्हा समोरून उत्तर आलं कन्नडमध्ये बोला, तेव्हा मी त्यांना कन्नडमध्ये विचारलं तुम्ही कोण आहात?
त्या महिलेनं आपलं नाव, सहाना असं सांगितलं. त्यानंतर मी तिला विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, तर तिने मला सांगितलं की मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही माझ्यावर रागवाल, तेव्हा मी तिला सांगितलं की मी रागवणार नाही, तेव्हा ती म्हणाली मला माझ्या सासुला मारण्यासाठी दोन गोळ्या लिहून द्या,
मी तुमचं नाव कोणालाच सांगणार नाही, तिने खूप विनवली कोली. त्यानंतर मी या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आम्हालाही आधी धक्का बसला, त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल होताच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज