मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
बारावीची परीक्षा कालपासून सुरु झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. यामध्ये एकाच्या परीक्षेला दुसराच परीक्षार्थी येऊन बसल्याचं उघड झालं.
तोतया परीक्षार्थींने पेपर ही लिहिला मात्र उत्तर पत्रिकेवर दोन वेगवेगळ्या सह्या दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात त्या परीक्षार्थ्यांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेवरील परीक्षा केंद्रावर काल बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला वैभव केशवराव कदम या विद्यार्थ्याने त्याच्या ऐवजी दुसरा परीक्षार्थी बसवला त्याने पेपरही दिला.
याबाबत शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी त्याठिकाणी तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर ससाणे यांनी केंद्र प्रमुख यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून केंद्र प्रमुख अंकुश भोसले यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात वैभव केशवराव कदम याच्या विरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मॉल प्रॅक्टिस एक्ट युनिवर्सिटी,बोर्ड अँड ऑदर स्पेसिसाईट एक्झामिनेशन ए अॅक्ट 07 नुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान जिल्ह्यात मोठा गाजावजा करत कॉपी मुक्त अभियान राबवणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनेक ठिकाणी कॉपी करण्यात आलीय ज्यात विविध ठिकाणी 11 जणांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे.
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : देवेंद्र फडणवीस
दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा,
परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज