मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या अकरा वाळूमाफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,
उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियांची दादागिरी रोखण्यासाठी वाळू संबंधात अधिक गुन्हे करणाऱ्या ११ जणांचा प्रस्ताव तयार केला होता.
अनिल लक्ष्मण पवार (रा. गुरसाळे ता.पंढरपूर), कृष्णकांत दत्तात्रय पळसे (रा. तपकिरी, शेटफळ, ता. पंढरपूर), सचिन चांगदेव काटे (रा.शेगाव दुमाला, ता. पंढरपूर), सुधीर ऊर्फ बापू संभाजी कांबळे (रा.चळे, ता. पंढरपूर), पंकज रामदास घाडगे (रा. चळे ता. पंढरपूर, मुळ रा. कडबे गल्ली पंढरपूर),
सुनील नाथ देठे (रा.लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर), रवी ऊर्फ सूरज शंकर आटकळे (रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर), विक्रम हनुमंत चोंडे (रा.आंबे ता.पंढरपूर), सागर प्रकाश साळुंखे (रा.आंबे ता.पंढरपूर), सचिन तुकाराम भोई (रा. सरकोली ता.पंढरपूर),
मारुती दगड्डू बोंबाळे (रा. गोपाळपूर ता. पंढरपूर) असे एकूण ११ जणांचे महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे दोन वर्ष हद्दपारीचे प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी अकरा आरोपींचे ५६ (१) (अ) (ब) चे प्रस्ताव मंजूर केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे, पोनि टी. वाय. मुजावर, सपोनि विश्वास पाटील, पोउपनि भारत भोसले, सपोनि. विभावरी रेळेकर, पोउपनि विक्रम वडणे यांनी केली आहे.
हद्दपार केलेल्या सहा आरोपींना सांगली जिल्ह्यात, तीन आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यात, आणि एकाला पुणे ग्रामीण, जिल्ह्यात एकास सातारा जिल्ह्यात संबंधित पोलिस स्टेशनला ५६(१) (अ) (ब ) ची कारवाई नोंद करण्यात आलेली आहे व एकूण ११ जणांना सोलापूर जिल्ह्यांतून दोन वर्षाकरिता हद्दपारच्या नोटीस बजावून हद्दपारची कारवाई करण्यात आलेली आहे. टी. वाय. मुजावर, पोलिस निरीक्षक, पंढरपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज