मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच्या दिवशीच ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना गुरुवार ९ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली.
याबाबत अनिता निखिल घोंगडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा ५ डिसेंबर २०२४ रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर ८ डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाची रिसेप्शन पार्टीही दिली होती.
घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निःशब्द होती.
बुधवारी निखिल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबीयांसमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते.
गुरुवारी पहाटे ४:३० च्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्राशेड मधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.
दरम्यान, घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाइक तिचा शोध घेत असताना तिने पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले.
नातेवाइकांनी तिला खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.
पतीच्या निधनानंतर तिसऱ्या विधीला पत्नीचा गळफास !
निखिलचा ५ डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. विवाहानंतर एक महिन्यातच अचानक निखिलचा ७ जानेवारी २०२५ रोजी मृत्यू झाला. पती निखिलच्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्याने पत्नी अनिता हिने गुरुवार ९ जानेवारी रोजी तिसऱ्याच्या विधी दिवशी गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले.
■ पती-पत्नीच्या एकापाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाच परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव हळहळ व्यक्त करीत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज