टीम मंगळवेढा टाईम्स ।
मारकडवाडी येथे सभा घेऊन शरद पवार मागे फिरताच काही ग्रामस्थ आक्रमक झाले. गावात एकत्र येऊन राम सातपुतेंच्या समर्थनार्थ आणि ईव्हीएमच्या बाजूने घोषणा दिल्या. जय श्रीरामच्याही घोषणा दिल्या.
मारकडवाडी येथे मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचे यादीसह फलक लावण्यात आले होते. राम सातपुते यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल स्वागताचा बॅनर शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणी लावला होता.
तो बॅनर शरद पवारांना दिसू नये म्हणून त्या बॅनरच्या आडवा बॅनर जानकर समर्थकांनी लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु, नंतर आडवा लावलेला बॅनर काढण्यात आला.
यावेळी पांडुरंग चोपडे व अजिंक्य मारकड म्हणाले, जानकरानी शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. गावपुढाऱ्यांनी पैसे आणले पण होते, पण तरीही जानकरांना मारकडवाडीत – अपेक्षित मतदान झाले नाही.
कधीही निवडणूक घ्या, मारकडवाडी गाव विकासाच्या मागे, आरोग्यदूत राम सातपुतेंच्या मागे उभे आहे. गावातील चार पुढारी एकत्र येऊन हा स्टंट चालू असून, संपूर्ण गाव आजही राम सातपतेंच्या पाठीशी आहे.
मारकडवाडीत शरद पवारांच्या सभेवेळी बाहेरचा पुढारी दमदाटी करत असल्याचे मारकडवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी विजयकमार मारकड, संदीपान कोडलकर, भगवान कोडलकर, आप्पाजी मारकड, अविनाश कोडलकर, आनंदा मारकड, पंकज कोडलकर यांनी ईव्हीएमच्यासमर्थनार्थ घोषणा दिल्या.(स्रोत:लोकमत)
मारकडवाडी येथील जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही. मोहिते-पाटलांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. मोहिते-पाटील आणि जानकरांनी दिलेले चॅलेंज स्वीकारतो. कधीही निवडणूक लावायची तयारी करावी.
आम्ही तयार आहोत. निवडणूक प्रशासनाने घ्यावी. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नव्हे. शरद पवारांचे माळशिरस तालुक्यात आम्ही स्वागत केले. त्यांनी आम्ही केलेल्या विकासकामांची पाहणी करावी, असे आवाहन होते.- राम सातपुते, माजी आमदार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज