mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! अनिल सावंत यांची मतदारसंघात ताकद वाढली, वसंतनाना देशमुख यांचा तुतारीला पाठिंबा; येत्या चार ते पाच दिवसात अनेक घडामोडी घडणार; खा.मोहिते पाटलांचे सूतोवाच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 8, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
Breaking! अनिल सावंत यांची मतदारसंघात ताकद वाढली, वसंतनाना देशमुख यांचा तुतारीला पाठिंबा; येत्या चार ते पाच दिवसात अनेक घडामोडी घडणार; खा.मोहिते पाटलांचे सूतोवाच

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील दिग्गज नेते वसंतनाना देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही यशस्वी शिष्टाई केली आहे.

याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारणीनेही अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना हा धक्का मानाला जात आहे.

वसंतनाना देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. देशमुख यांनी खासदार शरद पवार यांची अनेकदा भेट घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.

वसंतनाना देशमुख यांना कासेगाव जिल्हा परिषद गटासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात म्हणणारा एक मोठा गट अस्तित्वात आहे. देशमुख यांच्या पाठिंब्याने अनिल सावंत यांना मोठे पाठबळ मिळणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे.

याचवेळी मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे मतदार संघात अनिल सावंत यांना मोठे पाठबळ मिळाले आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे अनिल सावंत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने भगीरथ भालके हे निवडणूक लढवीत आहेत. दोघात मैत्रीपूर्ण लढत होत असताना काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्याने मतदार संघात चर्चा होत आहेत.

यावेळी राहुल शहा, पांडुरंग जावळे, अशोक पवार, शिवाजी पवार, राजाराम जगताप, विजय देशमुख, दिलीप जाधव, शिवशंकर भांजे, बाबुराव पाटील चंद्रकांत पाटील संतोष गोवे मुबारक शेख, विकास मिटकरी लक्ष्मण गायकवाड विक्रम साखरे,नामदेव डांगे, पांडुरंग मेहकर,अशोक लेंडवे, दिलीप कौसाळे हे उपस्थित होते.

येत्या चार ते पाच दिवसात अजून घडामोडी होतील

खासदार शरद पवार यांनी अनिल सावंत यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येत्या चार ते पाच दिवसात अजून अनेक घडामोडी होतील. आणि खा.पवार  यांच्या सभेनंतर मतदारसंघातील चित्र पूर्ण पालटलेले दिसेल. अनिल सावंत हे विधानसभेची पहिली नक्कीच चढणार आहेत. – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

खासदार मोहिते पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा

विधानसभा निवडणूक लागण्याआधी मी आणि वसंत नाना देशमुख दोघेही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. तसेच आम्ही पवार साहेबांना आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही त्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करू असे सांगितले होते. त्यानुसार वसंतनाना देशमुख यांनी खासदार शरद पवार यांना दिलेला शब्द खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साक्षीने पाळला आहे.

तसेच खासदार मोहिते पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून मला काँग्रेस पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. आगामी काळात या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना कधीही पश्चाताप होऊ देणार नाही. – अनिल सावंत, उमेदवार महाविकास आघाडी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंत पाठिंबावसंतनाना देशमुख

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

मोठी बातमी! येत्या दोन दिवसात सजग नागरिक संघ घेणार महत्त्वाचा राजकीय निर्णय; मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीसंदर्भात बैठक

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा