टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळ तालुक्यातील इचगाव येथील जमिनीचा कोर्टातील दावा पूर्णपणे निकाली करून देतो, असे सांगून ५० लाखांची मागणी केली. ३७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, १९ फेब्रुवारी २०१८ ते २४ जून २०२४ दरम्यान फिर्यादी उद्धव विठ्ठल घोडके (वय ६१, रा. बी भैरव कॉलनी, दमाणीनगर) यांनी इचगाव येथील जमीन गट क्र. २९० क्षेत्र १२ हेक्टर ३५ चा व्यवहार केला होता.
मात्र, त्या जागेवर दिवाणी दावा असल्याने तो थांबला होता. उस्मान शेख व अयुब जमादार यांनी त्यांना कोर्टातील दावा निकाली करून देतो, ५० लाख रुपये खर्च द्या, असे म्हणाले.
अयुब जमादार यांनी त्यांना जबरदस्तीने पंढरपूर येथे एका मांत्रिक बाबाकडे नेले, तेथे कपात कसले तरी द्रव्य पिण्यास दिले. मांडी घालून डोळे मिटून बसण्यास सांगितले. घराचा दरवाजा बंद करून मोरपंखाच्या झाडूने डोक्यावर मारून २५ मिनीट घरात कोंडून जादूटोणा केला.
थोड्या वेळात मांत्रिकाने एका बॅडमला फोन लावून दिला. फोनवरील महिलेने मी कोर्टातून बोलते, तुम्ही ठरल्याप्रमाणे ५० लाख रुपये द्या. ५० हजार रुपये माझी फी बाबांकडे द्या. एक महिन्यात तुम्हाला निकाल करून देते, असे म्हणून फोन बंद केला. तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
पाचपैकी तिघांना केली अटक
अयुब राजेखान जमादार, शाहरुख अयुब जमादार, लुमयेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, अंबीर गुलाब पठाण (रा. बेगमपूर, ता. मोहोळ), तांत्रिक बाबा तौसिफ तुराबखान मुसरगुफीफी (रा. टाकळी ता. पंढरपूर), शेख नावाची मॅडम या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील पहिल्या तिघांना अटक झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज