टीम मंगळवेढा टाईम्स ।
सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा परीक्षेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी येथील अक्षय जगदीश पाटील हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत बाजी मारली आहे.
अक्षय जगदीश पाटील यांने 48 वी रँक तर माचनूर येथे कार्यरत असलेले तलाठी प्रदीप गुजर यांनी देखील 38 वी रँक मिळवली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महेश अरविंद घाटुळे यांने बाजी मारली आहे. प्रितम मधुकर सानप यांने दुसरा क्रमांक पटकावला आहे
तर वैष्णवी हरिभाऊ बावस्कर हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. आता उमेदवारांना आपल्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार असून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 साली गट अ आणि गट ब दर्जाच्या 303 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाना जाहीर केलेली ही गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. पालघरच्या अमित मोतीराम भोये याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून चौथा क्रमांक पटकावला आहे.
अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो,
उमेदवार अपात्र ठरू शकतो. प्रशासकीय कारणास्तव बैठक क्रमांक PN005080 यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध न्यायालयात, न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
MPSC परीक्षा 1 डिसेंबर रोजी होणार
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही येत्या 1 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या आधी दोन वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता आयोगाने नवीन तारीख जाहीर केली आहे. यामध्ये कृषी सेवेतील 258 पदांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज