टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची सुरुवात केली. योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
२०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होईल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (पीएफआरडीए) ही योजना राबवण्यात येणार आहे.
काय आहेत योजनेच्या अटी?
■ १८ वर्षापर्यंतची सर्व मुले यासाठी पात्र असतील. खाते फक्त मुलांच्या नावाने उघडले जाईल; परंतु त्यांचे पालक पैसे जमा करतील. मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील.
■ जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे उघडले येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म ई-एनपीएसद्वारे देखील उघडू शकतात.
■ हे खाते कमीत कमी १००० रुपयांनी उघडता येईल. यात गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल.
■ तीन वर्षाच्या लॉक-इन कालावधीनंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल.
■ मुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. मूल १८ वर्षांचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही.
मुलांच्या वाढदिवसानिमित्त एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक करा
आई-वडील तसेच पालकांना अल्पवयीन मुलांच्या वाढदिवसानिमित्त तसेच इतर प्रसंगी एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक करता येईल.- निर्मला सीतारामन, अर्थमंत्री
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज