टीम मंगळवेढा टाईम्स।
अतिवृष्टी झालेला सोलापूर जिल्ह्याबरोबरच मंगळवेढा तालुका मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे.
तात्काळ अतिवृष्टी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतीपिकांचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी मुजमिल काझी यांनी निवेदनाद्वारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सतत सुरू असलेला पाऊस तसेच पुणे भागामध्ये पडलेल्या पावसामुळे उजनी धरणावरील सर्व धरणे भरल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा उजनीमध्ये सोडण्यात आला आहे.
त्यामुळे उजनी धरणे शंभर टक्के भरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही मोहोळ तालुक्यात झाली असून, मात्र शासनाकडून कुठलेही पंचनामे झाले नाहीत अथवा अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदत यादीत सोलापूर जिल्ह्याचा समावेश नाही.
त्यामुळे राज्यातील फक्त २६ जिल्ह्यांना मदत मिळणार आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील मदतीचा हात मिळावा- मुजमिल काझी, शेतकरी.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज