टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्याचे तहसीलदार माधव जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय दि.३० जुलै २०२४ नुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी १ ऑगस्ट, २०२४ हा दिवस महसूल दिन व महसूल दिनापासून दिनांक १ ते १५ ऑगस्ट या दरम्यान “महसूल पंधरवडा साजरा करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.
सदर शासन निर्णयातील उपक्रम क्रमांक १५ मध्ये दिनांक १५ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण, व पंधरवडा सांगता समारंभ आयोजित करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा जिल्हास्तरावर गौरव-सन्मान करणेच्या अनुषंगाने अधिकारी / कर्मचारी यांची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार प्राप्त अधिकारी / कर्मचारी यांना शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं. ४. शिवछत्रपती रंगभवन येथे वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
तहसीलदार मदन जाधव यांनी सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी यांना विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी महसूल पंधरवडा अंतर्गत प्रत्येक मंडळातील नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही अधिकाधिक विकास योजना लोकांपर्यंत पोहचवू. तालुक्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता काळजी घेऊ असे तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज