टीम मंगळवेढा टाईम्स ।
घराचा ताबा दिल्यानंतर घरात राहण्यास गेल्यानंतर मुलाने वडिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणात सून, नातू व अन्य एकाचा समावेश असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना फताटेवाडी (ता. द. सोलापूर) येथे घडली.
दरम्यान, हरिबा गंगाराम चव्हाण (वय ८२, रा. फताटेवाडी, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम (वय २९), सुनीता (वय २८, सून), मयूर (वय १८, नातू) व सपना (वय १९) यांच्याविरोधात
वळसंग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५ (२), ११९ (१), २२३, ३ (५), ३२४ (४), ३२४ (५), ३५१ (२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ८ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी हरिबा चव्हाण यांना वळसंग पोलिस, फताटेवाडीचे ग्रामसेवक, तलाठी यांनी घराचा ताबा दिला.
त्यानंतर फिर्यादी हे दुपारी तीन खोल्यांची साफसफाई करत असताना चौघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली. याचवेळी फिर्यादीच्या खिशातील पैसैही काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेत घराचा दरवाजा, कुलूप असे एकूण २ हजारांचे नुकसान केले आहे. यावेळी सुरू असलेले भांडण तेजूसिंग देविदास राठोड, फिर्यादीची पत्नी, मुलगा यांनी सोडवले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज