टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात २ लाख ५ हजार ५०१ क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धरण सोमवारी १०२ टक्के भरले आहे. उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून सायंकाळी १ लाख २६ हजार ६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
संगम येथे १ लाख ४० हजार क्युसेक विसर्ग असून पंढरपूर येथे ६६ हजार क्यूसेक असली तरी मंगळवार सकाळपर्यंत पंढरपूर येथील विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पंढरपूर येथे पूरस्थिती निर्माण होणार आहे. दुपारी १२ वाजण्याचा सुमारास उजनी धरणाची पाणीपातळी १०० टक्के झाली होती. सायंकाळी १०२.८९ टक्के झाली होती. सध्या धरणात ११८.७८ टीएमसी पाणीसाठा झाला असून ५५.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
आपत्कालीन व्यवस्था सज्ज
भीमा नदीची वाढती पाणीपातळी पाहता पंढरपूर शहरासह तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये। म्हणून अग्निशमन वाहन, एक स्पीड बोट सतर्क ठेवण्यात आली आहे. दोन ट्रॅक्टर, एक ट्रक नागरिकांचे साहित्य ने-आण करण्यासाठी तयार ठेवली आहे.
या सर्व परस्थितीवर प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी सुधीर गवळी, तहसीलदार सचिन लंगुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वाळूजकर व पोलिस प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.
पुराचा धोका असलेली प्रमुख गावांची नावे अशी
मंगळवेढा : उचेठाण, बठाण, तामदर्डी, ब्रम्हपूरी, रहाटेवाडी, माचणूर, सिध्दापूर, तांडोर, बोराळे, मुढवी, आरळी.
मोहोळ : मिरी, वाघोली, वटवटे, याशिवाय माळशिरस, पंढरपूर, माढा या तालुक्यातील गावे आहेत.
द.सोलापूर: हत्तरसंग, कुडल, कारकल, चिंचपूर, कुरघोट, बोळकवठे, तेलगाव, खानापूर, कुसूर, वडापूर, औज, भंडारकवठे, सादेपूर, बाळगी, लवंगी, टाकळी,
अक्कलकोट : अंकलगे, खानापूर, म्हैसलगे, कोर्सेगाव, आळगे, आंदेवाडी, हिळ्ळी, देवीकवठा, कुडल ही गावे आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज