टीम मंगळवेढा टाईम्स ।
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मुधोजी कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर नोकरी लावतो असे सांगून २० लाख रुपये घेतले.
पैशाची मागणी केली असता, १० लाख रुपये खात्यात जमा केल्याची बनावट पावती व्हॉटसअॅपवर पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार १ मे २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला. ६७ सुभाष गणपतराव वाघमारे (रा. मोदीखाना, सोलापूर) यांची मुलगी दीपाली सुभाष वाघमारे या उच्चशिक्षित आहेत.
त्यांना प्राध्यापक पदावर नोकरी लावण्यासाठी सुभाष वाघमारे प्रयत्नशील होते. दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तींनी त्यांना फलटण येथील मुधोजी कॉलेजमध्ये जागा आहे. तेथे प्राध्यापक म्हणून कामाला लावतो असे अश्वासन दिले.
नोकरी लावण्यासाठी त्यांनी सुभाष वाघमारे यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. मात्र नोकरी न लागल्याने त्यांना संशय आला, त्यांनी त्या व्यक्तीला दिलेले पैसे, परत करण्याची मागणी केली.
पैशाचा तगादा लावल्याने त्या व्यक्तीने वाघमारे यांना युनियन बँकेतून १० लाख रुपये त्यांच्या खात्यात पाठविल्याची पावती व्हॉटसअॅपवर पाठवली. पाठवलेल्या पावतीची पडताळणी केली असता, ती बनावट असल्याचे लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुभाष वाघमारे यांनी याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून गुन्हा जुना असल्याने भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६८, ४७१ प्रमाणे तुळसीदास तात्याबा जाधव (रा. सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज