टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील चार दिवसांपासून पुणे जिल्हा आणि भीमा खोरे परिसरात पडत असलेल्या मुसळधार पाऊस आणि उजनीवरील विविध धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उजनी प्लसमध्ये आले.
मागील तीन दिवसात उजनी मध्ये १७ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण पाणीसाठा ७० टीएमसी इतका झाला आहे.
तर आज रात्री उजनीच्या पाणीपातळीत वाढ होऊन आज शनिवारी दुपारपर्यंत उजनी ३० टक्केपर्यंत पाणीसाठा जाणार आहे.
उजनीची पाणी साठा ७० टीएमसी झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा ५७२ टीएमसी इतका झाला आहे तर १०.६७ % घरण भरलेले आहे.
तर घरण शंभर टक्के म्हणजेच १२३ टीएमसी होण्यासाठी आणखीन ५३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
आज शनिवारी दुपारपर्यंत १ लाख क्युसेसचा विसर्ग सुरू राहणार आहे आज दुपारपर्यंत धरणाची २५ ते ३० टक्के इतकी पाणी पातळी होणार आहे. तर आज रात्री विसर्गात घट होऊन पाणी पातळीत वाढ होणार आहे. उजनी प्लसमध्ये आल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली.
५ वर्षानंतर आला मोठा विसर्ग
गुरुवारी बंड गार्डन येथून विसर्ग वाढल्याने दौंडमधून एक लाख ८८ हजार क्युसेक चा विसर्ग शुक्रवारी दुपारी एक वाजता जमा होत होता. पाच वर्षांपूर्वी २४ ऑगस्ट २०१९ रोजी १ लाख ९० हजार क्युसेक इतका विसर्ग मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये येत होता.
सध्या वडज २००० चिलेवाडी १६९८ कळमोडी ६३४ वडिवळे २१७२ मुळशी ५३०० या धरणातून विसर्ग सुरू आहे. खडकवासल्याचा ४०००० क्युसेक चा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज