टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्नी १३जुलैपर्यंत राज्य सरकारने ठाेस निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही.
सरकारने एक महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू, असा इशारा आज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना दिला. तसेच त्यांनी १३ जुलैपर्यंत आपले बेमुदत उपाेषणही स्थगित केले आहे.
दिलेला शब्द पाळणार
मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपाेषणाचा आज सहावा दिवस आहे. आज अंतरावली सराटीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली.
मंत्री शंभुराज देसाई जरांगे-पाटील यांच्याशी बोलत असताना म्हणाले, “दिलेला शब्द पाळणार. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला आमचा विरोध नाही. पण सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला घाई नको.
उद्या (दि.१४) उपमुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहोत. तुमचाही एक प्रतिनीधी पाठवा. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी द्या. आचारसंहितेत वेळ गेल्यामुळे थोडं सहकार्य करा.
तर राजकारणात उतरणार
मंत्री शंभुराज देसाई यांच्या संवादानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, एक महिन्यात जर निर्णय झाला नाही तर निवडणुकीत उतरणार “आणि कोणीही मराठ्यांच्या दारात यायच नाही. १३ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला अल्टीमेट दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज