टीम मंगळवेढा टाईम्स।
माहेरहून एमआरआय मशीन घेण्यासाठी पैसे आण म्हणून मारहाण केल्याने डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी डॉक्टर असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शोधण्यासाठी दोन पथके रवाना केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिली.
पतीच्या जाचाला कंटाळून डॉ. ऋचा रूपनर यांनी सहा जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत डॉ.ऋचा हिने पती सूरज याच्या व्याभिचारीचा जाब विचारला असता ऋचाला लाथा बुक्क्याने मारहाण केली होती.
तसेच हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन आणण्यासाठी तू तुझ्या घरून पैसे आणून दे किंवा तुझ्या नावावर असलेल्या जमिनीवर कर्ज काढ नाहीतर तू आत्महत्या कर अशी धमकी दिली. ही बाब ऋचाने माहेरी सांगितली होती. सततच्या जाचाला कंटाळून ऋचाने आत्महत्या केली.
देवेंद्र गटाचा विरोध, तरीही विनोद तावडेंमुळे रक्षा खडसेंना मंत्रिपद
महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली. त्यापैकी पीयूष गोयल आणि नितीन गडकरी यांना स्वकर्तृत्वाने, तर रामदास आठवले यांना भाजपचा मित्रपक्ष म्हणून स्थान मिळाले. रक्षा खडसे या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या शिफारशीने, तर मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीने मंत्री झाले आहेत. या निमित्ताने भाजपचे सत्ताकेंद्र बदलत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
याचे कारण म्हणजे २०१४ पासून आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाची वर्णी लावायची यांची नावे ठरवताना देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम असायचा. त्यांच्यामुळेच गेल्या वेळी सुभाष भामरे, भारती पवार, कपिल पाटील, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांना मंत्रिपदे मिळाली.
झालेल्या रक्षा खडसे यांच्या नावाला देवेंद्र फडणवीस गटातून विरोध होता. त्यांचे समर्थक मंत्री गिरीश महाजन व खडसे यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. महाजन यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपत घेण्यासही विरोध केला.
तसेच रक्षा खडसेंच्या उमेदवारलाही त्यांचा विरोध होता. मात्र भाजपच्या केंद्रीय राजकारणात आता महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तावडे यांनी भाजप हायकमांडला नाथाभाऊंना पुन्हा पक्षात घेण्यासाठी राजी केले. रक्षा खडसे यांनाही पुन्हा रावेरची उमेदवारी मिळवून दिली.
इतकेच नव्हे तर मोठ्या मताधिक्याने व तिसऱ्यांदा खासदार झाल्याच्या निकषावर रक्षा यांना केंद्रात राज्यमंत्रिपदही मिळवून दिले. फडणवीस गटाचा विरोध असूनही खडसेंच्या मंत्रिपदाचा निर्णय झाल्याने गिरीश महाजन गटाला धक्का बसला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज