टीम मंगळवेढा टाईम्स।
गेली साडेचार वर्षे माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कधीच फिरकलेच नाहीत. गेली सहा महिने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान खासदारांनी वेगवेगळी आश्वासनांचा पाऊस पडला आहे.
गेली साडेचार वर्षे सोशल मीडिया वरून ‘खासदार दाखवा व बक्षीस मिळवा’ अशा सोशल मीडियावर पोस्ट पडत होत्या. त्यामुळे साडेचार वर्षे मतदार संघात न फिरणाऱ्या खासदाराविरोधात मतदार आक्रमक झाले आहेत. नेतेविरुद्ध मतदार असे सध्याचे चित्र आहे.
गेल्या साडेचार वर्षात एमआयडीसीसाठी व शेतकर्यांच्या प्रश्नावर साधा आवाजही न उठवणारे खासदार निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. गेली साडेचार वर्षे मतदार संघात एखादेही मोठे ठोस विकासाचे काम झाले नाही. साडेचार वर्षे मतदार संघात खासदार फिरकलेच नाहीत.
पाणी आणले-पाणी आणले, पाणीदार खासदार म्हणून मिरवणार्या खासदारांना साडेचार वर्षात पाणी का आणता आले नाही? निवडणुकीच्या तोंडावर सहा महिने पिके जळाल्यावरच पाणी कसे आणले? साडेचार वर्षे पाणी होते का? पाणी लागत नव्हते का असे एक ना अनेक प्रश्न मतदार विचारत आहेत.
या विद्यमान खासदारांना अद्यापही मतदारसंघातील गावे माहीत नाहीत. साडेचार वर्षात एकाही गावात न फिरकणारे खासदार निवडणुकीच्या तोंडावरच मतदारसंघात फिरू लागल्याने मतदारात तीव्र नाराजी पसरली आहे.
खासदार अजुनही गावोगावच्या कोणत्याच पक्षाच्या पुढार्यांना आजही ओळखत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघात फिरकल्याने मतदार संघात मतदारांनी विद्यमान खासदारांकडे पाठ फिरवली आहे. सर्वसामान्यात प्रचंड असंतोष आहे.
सर्वसामान्यांची कोविडच्या काळात व इतरही वेळेत गेली साडेचार वर्षे विचारपूसही न करणारे खासदार सहा महिन्यांपासून मतदार संघात दौरे करून मतदारांची दिशाभूल करत आहेत. विद्यमान खासदारांनी गेली साडेचार वर्षात तालुक्यात शेतकरी व सर्वसामान्यांवर अनेक प्रसंग ओढावले त्यावेळी त्यांनी साधी विचारपूसही केली नाही.
मतदारसंघात फिरकलेच नसल्याने सध्या तरी खासदारांच्या विरोधात मतदान करण्याच्या तयारीत आहेत. वाड्यावस्त्यांवर व ग्रामीण भागात सध्या तरी तुतारी घेतलेल्या माणसाचा” आवाज आहे.
मतदारसंघात साडेचार वर्षात खासदार फिरकलेच नसल्याचा रोष मतदारांच्या मनात आहे. सध्या या विद्यमान खासदारांचा प्रचार करणारे नेते साडेचार वर्षात या खासदाराच्या नावाने बोंबा मारत होते.
विद्यमान खासदारांनी सांगोला शहर व तालुक्यात विकास निधीच्या केलेल्या घोषणांचा निधीच प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येते. साडेचार वर्षे शेतीला पाणी का सोडले नाही? निवडणुकीच्या तोंडावर पिके जळाल्यावर पाणी का पाणी सोडले? हे पाणी राज्य सरकारने सोडले का केंद्र सरकारने सोडले हे शेतकर्यांना अद्याप पर्यंत कळालेच नाही. शेतकरी वर्गात सध्याच्या सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे.
शेतकरी प्रचंड संकटात असताना विद्यमान खासदारांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याचा फटका येणार्या लोकसभेच्या निवडणुकीत बसणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. शेवटी दोन दिवस महत्त्वपूर्ण वाटाघाटी झाल्या तरी सुद्धा शेतकरी या खासदारांना मतदान करणार नाही अशा भूमिकेत मतदार असल्याचे चित्र आहे.
सध्या तालुक्यात प्रचार करणार्या नेतेमंडळीं समोर आल्यानंतर मतदार तुम्ही सांगेल त्यांना मतदान करू. नेतेमंडळी गेल्यावर त्यांचे काय ऐकायचे आम्ही आमच्या मताचे मालक आहोत आम्ही या विद्यमान खासदाराला मतदान करणार नसल्याचे बोलतात.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज