टीम मंगळवेढा टाईम्स ।
हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत अनिल दादा सावंत कुस्ती किताब पुण्याच्या रविराज चव्हाण यांने प्रथम क्रमांकाचा कुस्ती किताब पटकावला आहे.
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील सलगर(बु) येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पै.रविराज चव्हाण (पुणे) व विरुद्ध पै. विजय शिंदे यांच्यात लढत झाली. यामध्ये रविराज चव्हाण यांनी दोन लाख रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले.
तर दोन नंबरला पै.पृथिराज चौंडे (नंदेश्वर-) व पै.प्रदीप ठाकुर (सांगली) यांच्यात लढत झाली. यामध्ये पै.प्रदीप ठाकुर (सांगली) यांनी एक लाख एकावण हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
यावर्षी आकर्षक म्हणजे महिला गट कुस्त्तीमध्ये पै.सोनाली मंडलिक (पुणे) व पै.वैदंती पवार यांची लढत बरोबरीची झाली.
दूसरा लढत पै. संजना डिसले (सांगली) व पै. धनश्री फंड (नगर) यांच्यात झाला .यामध्ये धनश्री फंड या विजयी झाल्या.यांनी पांच्याहत्तर हजार रुपयांचे परितोषिक पटकावले.
यावेळी शंभर होऊन जास्त छोट्या-मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यावेळेस सलगर व मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कुस्तीप्रेमी खेळाडू, भैरवनाथ शुगरचे कर्मचारी व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते.
या भागामध्ये वर्ष तिसरे भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान कुस्ती स्पर्धेपूर्वी अनिल(दादा) सावंत यांची सावंत प्रेमीनी सलगर गावातून मिरवणूक काढली व त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे व भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करणायात आले.
यावेळी जि.प उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प सदस्य व्यंकठ भालके, उद्योजक अमर पाटील, आप्पा माने सरकार, अशोक जाधव सर, राजू पाटील, शिरसु धायगोंडे, दत्ता टिकके, बाळ जाधव, श्रीशेल धायगोंडे, पांडुरंग कांबळे, समीर जाधव , मायप्पा पांढरे,
लवंगीचे उपसरपंच तानाजी खडतरे, शिवाजी चव्हाण, भारत निकम, अंकुश खताळ, लाला शेख, नानासाहेब बंडगर, राजू लकडे, यावेळी लवंगी ,सलगर व पंच क्रोशीतील कुस्त्ती प्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.महेंद्र देवकते, पै.मारुती वाकडे, ,पै.घुले, समाधान अभंगराव , अशोक चौंडे, इत्यादी पंचानी या संपूर्ण कुस्त्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सलगरचे माजी सरपंच रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर गुरुजी, तानाजी चव्हाण, इंद्रजीत पवार व अशोक निकम यांनी केले होते.
यावेळी भैरवनाथ शुगर मधीली सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्र संचालन धनाजी मदणे व दामोदर यांनी आभार प्रदर्शशन दामोदर घुले केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज