टीम मंगळवेढा टाईम्स।
राजकारणाच्या नावाखाली माझ्या जातीचं मुंडके कापून घ्यायचं नाही. आजच्या अहवालावरून उमेदवार देता येणार नाही. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही, ज्याला पाडायचे त्याला पाडा. कोणत्याच नेत्यांच्या सभेला जायचे नाही.
मी कुठेही प्रचाराला जाणार नाही. सगे सोयरेची अमलबजावणी झाली नाही तर आत्ताच विधानसभेची तयारी करायची”, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते आंतरवाली सराटी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
लोकसभा निवडणूक लढवू नका, असं आवाहनही जरांग यांनी मराठा समाजाला केलं आहे. मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील अहवाल जाणून घेतला. यानंतर बैठकीत त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
900 एकरची सभा जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर घेणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सगे सोयरेची अमलबजावणी झाली नाही तर आत्ताच विधानसभेची तयारी करायची. 93 मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. जे योग्य वाटेल , तो समाजाला निर्णय असेल. 900 एकरची सभा जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर घेणार आहोत. जिल्ह्या जिल्ह्यातून आलेल्या अहवालावर नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचेही स्पष्ट केले आहे.
सगे सोयरेची अंमलबजावणी करणाऱ्याच्या बाजूने राहावे
अपक्ष उमेदवार देणार नाही. सगे सोयरे ची अंमलबजावणी करणाऱ्याच्या बाजूने राहावे आणि समोरच्याला पाडावं. मराठा समाजाने कुठल्याही राजकारण्याच्या आणि पक्षाच्या सभेला जाऊ नये. जून महिन्यात बीड जिल्ह्यातील नारायण गडावर 900 एकर वर सभा घेणार आहे, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती भेट
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जरांगे यांनी 30 तारखेपर्यंत समाजातील सर्वांची मतं जाणून घेणार त्यानंतर भूमिका स्पष्ट करणार ,अशी भूमिका मांडली होती. आज अखेर त्यांनी निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही. मात्र, सगेसोयरीचे अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करणार , असं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज