टीम मंगळवेढा टाईम्स।
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतलाय. 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासंदर्भात किंवा जमा करण्यासंदर्भातील हा निर्णय आहे. काल 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे.
या दिवशी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा RBI च्या कोणत्याही कार्यालयामध्ये असणार नाही. या दिवशी 2000 रुपयांच्या नोटा जमाही केल्या जाणार नाहीत. कारण नवीन आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सगळे कर्मचारी कामात व्यस्त असणार आहेत.
2 एप्रिलपासून नोटा जमा किंवा बदलण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार
31 मार्चला 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. 1 एप्रिलपासून नवीन 2024-25 हे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे.
या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर RBI च्या 19 कार्यालयामध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलून दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळं ज्या नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा जमा करायच्या आहेत, त्यांनी नोटा 2 एप्रिल 2024 पासून जमा कराव्यात. 2 एप्रिलपासून नोटा जमा किंवा बदलण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती RBI ने आपल्या निवेदनात दिली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. ही आकडेवारी 1 मार्च 2024 ची आहे.
19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली होती. मिळालेल्या माहितीनुसार 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकेकडे जमा झाल्या आहेत. राहिलेल्या नोटा लवकरच जमा होतील.
RBI ने नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या कालावधीत नोटा जमा झाल्या नाहीत. त्यामुळं मुदत वाढवण्यात आली होती. ही मुदत पुन्हा 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.
त्यानंतर 9 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या 19 इश्यू कार्यालयात जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अद्यापही ही प्रक्रिया सुरुच आहे. फक्त 1 एप्रिल 2024 या दिवशी नोटा बदलून किंवा जमा केल्या जाणार नाहीत, असा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज