टीम मंगळवेढा टाईम्स।
शेती करायला माहेरहून दोन लाख रुपये घेवून ये असे म्हणून एका ३० वर्षीय विवाहितेस वारंवार मानसिक त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी
पती अमित मधुकर कांबळे, हेमा मधुकर कांबळे, अजित मधूकर कांबळे (सर्व रा.कामती बु।। ता. मोहोळ) या तिघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अर्चना अमित कांबळे हिचा विवाह पती अमित मधुकर कांबळे (रा.सिध्दापूर) याचेशी झाला होता.
तो फिर्यादीस दि.२८ मे २०२३ पासून ते २ नोव्हेंबर २०२३ च्या दुपारी २ वाजेपर्यंतच्या अखेर वरील तिघे आरोपी फिर्यादीवर संशय घेत असे, तसेच शेतीसाठी खर्चायला
माहेरहून दोन लाख रुपये घेवून ये असे म्हणून वारंवार मानसिक त्रास देवून लाथा बुक्क्याने मारहाण करत असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून
भा.दं.वि.कलम ४९८ (अ), ३२३,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून याचा अधिक तपास पोलीस नाईक चंदनशिवे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज