टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हे ब्रीदवाक्त घेऊन कार्तिकी वारी कालावधीत राबविण्यात आलेले महाआरोग्य शिबीर वारकरी-भाविकांसाठी आरोग्याची पर्वणी ठरले.
याअंतर्गत शासकीय आरोग्य विभागाने तब्बल १ लाख २५ हजार ५२ वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या मोफत आरोग्य सेवेचा लाभ दिला, तर महाआरोग्य शिबिराचा ७० हजार ८०३ वारकऱ्यांनी लाभ घेतला.
आषाढीनंतर कार्तिकी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठे परिश्रम घेतले. यासाठी दि.१९ नोव्हेंबरपासून २० ठिकाणी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली होती. तसेच ६५ एकर परिसरात ३ दिवस महाआरोग्य शिबिरात एकाच छताखाली अतिदक्षता विभागासह सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी व प्रतिबंधात्मक ते निदानात्मक उपचारांची व्यवस्था केली होती.
आरोग्य विभागाचे १९९२ डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी तसेच जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ व ‘भैरवनाथ शुगर’चे एक हजारावर स्वयंसेवक, शिवसेना शिंदे गटाच्या शेकडो पदाधिकारी, शिवसैनिकांनी वारकऱ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.
आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत व अनिल सावंत हे स्वतः या ठिकाणी तळ ठोकून सर्व व्यवस्था पाहत होते.
आरोग्य विभागाने वारी कालावधीत १ लाख २५ हजार ५२ वारकऱ्यांना विविध प्रकारची आरोग्य सेवा दिली. यात महाआरोग्य शिबिरात तब्बल ७० हजार ८०२ वारकऱ्यांनी विविध आरोग्य तपासणी व औषधोपचार घेतले.
तसेच ३ ठिकाणी ‘आपला दवाखाना’मधून ७ हजार ४४४, ११ औषधोपचार केंद्रातून ५ हजार ५६१, ८ प्राथमिक आरोग्य केंद्गातून २ हजार ३६३, उपजिल्हा रूग्णालयात ५ हजार ५४५, ५ अतिदक्षता विभागात ११ हजार ६७५, २० आरोग्य दुतांमार्फत १८ हजार ८०१, तर ७ रूग्णवाहिकांनी २ हजार ८६१ वारकरी रूग्णांना सेवा दिली. १८ हजार ६३७ वारकऱ्यांची नेत्रतपासणी करून १५ हजार ४८६ जणांना चष्मे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या नेतृत्वाखाली १ हजार ९९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांची आरोग्य सेवा केली.
‘भैरवनाथ शुगर’चे उपाध्यक्ष अनिल सावंत, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, तालुका प्रमुख शिवाजी बाबर, दत्तात्रय सावंत, मुन्ना भोसले, रामचंद्र जाधव, शाम गोगाव, नितीन शेळके, संजय बंदपट्टे, बालाजी बागल, आरती बसवंती आदींच्या मार्गदर्शनाखाली एक हजारावर स्वयंसेवक शिवसैनिक परिश्रम घेत होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रा.शिवाजी सावंत व सहकाऱ्यांनी शिबिरासाठी राबलेल्या सर्वांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
अतिदक्षता विभागाने वाचविले प्राण
चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर, दर्शन मंडप, पत्राशेड, उपजिल्हा रूग्णालय व श्री विठ्ठल मंदिर गाभारा अशा ६ ठिकाणी अतिदक्षता विभाग सुरू होते. यात ११ हजार ६७५ वारकऱ्यांवर तातडीचे उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे दोन वारकऱ्यांना हृदयविकाराचा झटका, तर एकाला ब्रेन स्ट्रोक होऊन मेंदूत रक्तस्त्राव झालेला असताना हे गुंतागुंतीचे रूग्ण कौशल्याने हाताळत त्यांचे जीव वाचविण्यात आल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज