mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात आजपासून अंडी अन् केळी मिळणार; प्रतिविद्यार्थी ‘इतक्या’ रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार; कुक्कुटपालन, फळबागाला प्रोत्साहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 22, 2023
in शैक्षणिक, सोलापूर
कौतुकास्पद! मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलचे 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शालेय पोषण आहारात आता आजपासून विद्यार्थ्यांना अंडी, पुलाव किंवा अंडा बिर्याणी मिळणार आहे. अंडी न खाणाऱ्यांसाठी केळी, चिकू, पेरी यापैकी एक फळ दिले जाणार आहे. आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या पैकी कोणत्याही एका दिवशी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) पत्रव्यवहार केला आहे.

स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंडी व फळे विकत घ्यायची आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्यांला ३० रुपये, याप्रमाणे अग्रिम दिला जाणार आहे.

आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना नवीन बदलानुसार आहार मिळेल, यादृष्टीने पोषण आहाराच्या योजनेसाठी पात्र चार हजार ९५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अंडी व फळांची खरेदी करायची आहे.

अंडी खाणाऱ्या व न खाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना अंडी व फळे द्यायची आहेत. दिवाळी सुटीनंतर आजपासून शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी किंवा या आठवड्यातील शुक्रवारी नवीन बदलानुसार आहार मिळेल.

शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी डॉ. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासंबंधीची कार्यवाही सुरु आहे.

कुकुटपालन, फळबाग लागवडीला प्रोत्साहन

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता शालेय पोषण आहारात अंडी व केळीचा समावेश करण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थ्यांची शाळांमधील गळती कमी होईल, असा विश्वास आहे.

दुसरीकडे गावात अंडी व फळे उपलब्ध असल्यास मुख्याध्यापक त्याची खरेदी करू शकणार आहेत. त्यातून स्थानिक पातळीवर कुक्कुटपालन व फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पाच रुपयांचा खर्च होणार असल्याने तेवढी रक्कम संबंधित शेतकऱ्याला जागेवरच मिळेल.

सोलापूर जिल्ह्यात ४.७० लाख लाभार्थी

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह इतर खासगी अनुदानित चार हजार ९५ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या चार लाख ७० हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो.

नवीन बदलानुसार आठवड्यातून एकदा अंडी व केळी दिली जाणार असल्याने त्यासाठी दर आठवड्याला जवळपास २३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून तो निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संबंधित शाळांना मिळणार आहे.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शालेय पोषण आहार

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
Next Post
मोठी बातमी! फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; उपमुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातले ‘हे’ साकडं; घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

मोठी बातमी! फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; उपमुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातले 'हे' साकडं; घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा