टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबकडून दुर्गराज रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहीमचे
प्रस्थान गुरूवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन करून सकाळी ६.०० वाजता होणार आहे.
सदर ऐतिहासिक सायकल मोहीम चार दिवसाची असुन पंढरपूर-वेळापूर-माळशिरस-नातेपूते-फलटण-शिरवळ-भोर-वरंध-महाड-पाचाड-रायगड या मार्गावरती गडकोट स्वच्छता व संवर्धन विषयी जागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात येणार आहे
स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना रायगड हा मूर्त साक्षीदार आहे किल्ल्यावरील जगदीश्वर मंदीर, बाजापेठा, छत्रपती शिवरायांची समाधी, राजवाडा, वाडे, महादरवाजा, शिरकाई मंदीर, राजदरबार, अष्टप्रधान वाडे
व सप्त मंजिली बुरुज तर पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांचा वाडा व समाधी ही ठिकाणे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत आहेत हे खरे देशाचे वैभव आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे तसेच शिवकाळात जसा रायगड होता
तसाच रायगड पुन्हा एकदा सर्वांना याची देही याची डोळा पाहता यावा त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समग्र विकास व्हावा यासाठी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबकडून मंगळवेढा ते रायगड या ऐतिहासिक सायकल मोहिमेतून जनजागृती करण्यात येणार आहे
महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ला जतन,संवर्धन व पर्यटन विकास करण्याचे काम हाती घेण्यासाठीही वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार आहे
सदर सायकल मोहीमेकरीता जगदंबा परिवाराचे अध्यक्ष चंद्रकांत घुले, शिर्के मल्टीस्पेशीलीटी हॅास्पिटलचे डॉ.शरद शिर्के, समर्थ हॅास्पिटलचे डॉ.नितीन आसबे, ट्रॅव्हल्स ग्रूपचे अविनाश चेळेकर, संजय डांगे, सचिन आवळेकर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज