टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या १ हजार १५२ इतकी आहे. सर्व बालकांना केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर झालेली सर्व आर्थिक मदत देण्यात आलेली असली तरी या सर्व बालकांची आरोग्य तपासणी व मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घ्यावे.
तसेच या बालकांना सर्व सोयी सुविधा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोविड प्रादुर्भाव कालावधीमध्ये बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.
यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, कोविड जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले, बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद,
बालकल्याण समितीचे सदस्य अॅड. सुवर्णा कोकरे, विजय फुटाणे, नीता गुंड, शहर पोलीस उपायुक्त अशोक तोरडमल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख, प्रतिनिधी व तालुका बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते.
कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या सर्व बालकांना मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करणे गरजेचे आहे. त्यानुसार महिला व बाल विकास कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडून तात्काळ या सर्व बालकांची तपासणी करून घ्यावी.
या सर्व बालकांना संबंधित तालुक्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या पाहिजेत. त्यांची शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व अन्य गरजा असतील तर त्या यंत्रणांनी त्वरित सोडवणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले.
बाल संगोपन योजनेअंतर्गत एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मार्च २०२३ पर्यंतचे प्रतिमहा अकराशे रुपये अनुदान मिळाले असले तरी एप्रिल २०२३ पासून ते आजपर्यंत प्रतिमहा २ हजार २५० रूपये दिले जाणारे अनुदान अप्राप्त असल्याने महिला बाल व विकास कार्यालयाने हे अनुदान बालकांना थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
कोविड काळात १ हजार ११२ बालके झाली अनाथ
सोलापूर जिल्ह्यात कोविड काळात एक पालक गमावलेले बालकांची संख्या १ हजार १०९ तर दोन्ही पालक गमावलेले ४३ बालक असल्याची माहिती बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी देऊन दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पीएम केअर फंडातून प्रतिबालक दहा लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रतिबालक पाच लाख रुपये निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बाल संगोपन योजनेतून पालक गमावलेल्या बालकांना आठ महिन्याचे प्रत्येकी १ हजार १०० रुपये प्रमाणे प्रतिमहा अनुदान वितरित करण्यात आल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज