टीम मंगळवेढा टाईम्स।
ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन फँटसी गेममुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचे नशीब उजळलं. या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली असल्याचे वृत्त समोर आले होते.
आता मात्र, या करोडपती पोलीस उपनिरीक्षकाचीचौकशी होणार आहे. पोलीस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे, अशात अनेकदा फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आलेत. असं असताना पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ‘ड्रीम 11’ खेळण्याचा मोह आवरला नाही.
मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळं त्यांना दीड कोटींची जणू लॉटरीचं लागली. दुसरीकडे ते करोडपती झाल्यानं चांगलेच प्रसिद्धीझोतात आले अन् आता अडचणीत ही आले.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलीस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो, हे लवकरच कळणार आहे.
प्रकरण काय?
झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते.
बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज