टीम मंगळवेढा टाईम्स।
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता महाराष्ट्रातूनही मान्सून ठरलेल्या वेळेत माघारी फिरताना दिसला. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून राज्यातून पूर्णपणे पावलं मागं घेताना दिसेल.
यादरम्यान काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी वगळता उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर, समुद्रकिनारी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हवेतील आर्द्रता वाढू शकते असाही अंदाज वर्तवला जात असून, तसं चित्रही सध्या पाहायला मिळत आहे.
तापमानात वाढ…
मागील काही दिवसांपासून विदर्भापासून नाशिक, पुणे आणि मुंबई या भागांमध्ये तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी या भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत असल्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्येही तापमानाचा आकडा असाच वाढलेला निदर्शनास येईल.
अचानक वाढलेल्या तापमानामुळं नागरिकांना आरोग्याच्या काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पहाटेच्या वेळी राज्यात तापमानाचा आकडा कमी होणार असून, थंडीची चाहूल लागणार आहे. त्यामुळं नागरिकांनी त्या अनुषंगानंही तयार राहावं असं आवाहन करण्यात येत आहे.
पश्चिमी झंझावात पुन्हा एकदा सक्रिय होत असल्यामुळं पुढील 48 तासांमध्ये या भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या धर्तीवर इथं यलो अलर्टही देण्यात आला आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्ये येत्या काही दिवसांच पावसाची हजेरी असेल तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र बर्फवृष्टी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती असेल. उत्तरेकडील राज्यांमध्ये किमान तापमानात काहीशी घट नोंदवली जाणार आहे.
पुढील काही दिवसांमध्ये सुरु होणारा सुट्ट्यांचा हंगाम पाहता उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू काश्मीर सारख्या भागांकडे पर्यटकांचा कल वाढताना दिसणार आहे. त्यामुळं तिथं जाणाऱ्या सर्वांनीच हवमानाचा आढावा घेऊनच पुढील बेत आखावेत असा इशारा देण्यात आला आहे.
ऑक्टोबर हिट १० ते १४ ऑक्टोबरपर्यंत जाणावणार आहे. यादरम्यान मुंबईच्या उपनगरातील तापमान हे ३४ ते ३५ डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. तसेच १२ ते १४ ऑक्टोबरमध्ये तापमान थेट ३७ डिग्री सेल्सिअस असणयाची शक्यता आहे. दरम्यान यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीचं वर्तवला होता.
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. तापमान वाढल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहारच्या काही भागातून मान्सून माघारी फिरलाय. महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मान्सून परतणार आहे. सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतलाय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज