टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट २०२३, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आलेली असून
तिसरी फेरी दिनांक ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
याअंतर्गत नियमित लसीकरण सत्राचे आयोजन निश्चित केलेल्या दिवशी सुरू आहे. अतिरिक्त सत्राचे नियोजन हे नियमित लसीकरण सत्राचा दिवस वगळून इतर दिवशी अति जोखमीच्या भागात करण्यात येत आहे.
झीरो ते दोन वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेले लाभार्थी, दोन ते पाच वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला आहे.
तसेच डीपीटी व ओरल लसीचा डोस राहिलेले लाभार्थी, गर्भवती महिला यांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करणे, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेला बालकाचा या मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, असे डॉ.पिंपळे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज