टीम मंगळवेढा टाईम्स
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार सोमवार दि.9 ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या www.mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आवेदनपत्र भरता येणार आहे.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरून स्वीकारली जाणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचे नियमित, पुनर्परीक्षार्थी, यापुर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाइन सादर करता येणार आहे.
दरम्यान, बारावीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची घोषणा झाली असून, दहावी साठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मूळव्याध, भगेंदर, फिशर आजारांसाठी मंगळवेढ्यात उद्या मोफत तपासणी शिबीर; शिवम हॉस्पिटल वेळापूर, डॉ.स्वप्नील कोकरे यांचा उपक्रम; 9552285320 या नंबरवर करा नाव नोंदणी
मंगळवेढा तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी शिवम हॉस्पिटल वेळापूर आणि डॉ.स्वप्नील कोकरे मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मूळव्याध, भगेंदर, फिशर या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
“साई समर्थ हॉस्पिटल” येथे मोफत तपासणी शिबीर
मंगळवेढा धर्मगाव रोडवर शिर्के हॉस्पिटल शेजारी असलेल्या “साई समर्थ हॉस्पिटल” येथे मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज