टीम मंगळवेढा टाईम्स ।
तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेल्या शेत जमिनीची मोजणी करून त्याबाबत हद्द कायम नकाशाचे प्रिंट व इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करत
अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाच लुचपत विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. करमाळा येथे सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक खंडू मारुती रेंगडे (वय ४७) असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या आईच्या नावे एक हेक्टर ३१ आर जमिनीची मोजणी होऊन त्याच्या बाबत हद्दी कायम करून
नकाशाची प्रिंट मिळणे बाबत १७ जानेवारी २२ रोजी तातडीचा अर्ज देऊन मोजणीसाठी शासकीय तीन हजार रुपये चालनाद्वारे भरली होती. तरीही रेंगडे यांनी तक्रारदार याच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून रेंगडे याला रंगेहात पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी,
पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, पोलीस शिपाई गजानन किणगी, शाम सुरवसे आदींच्या पथकाने कारवाई केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरा सुरु होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज