टीम मंगळवेढा टाईम्स ।
पीएम किसान योजनेअंतर्गत उर्वरित लाभार्थीनी आज गुरुवार, दि.७ सप्टेंबर रोजी केवायसी पूर्ण न केल्यास त्यांचे लाभार्थी यादीतून नाव वगळण्यात येतील.
मंगळवेढा तालुक्यात अनेक लाभार्थीचे ई-केवायसी नाही. ज्यांची केवायसी अद्याप करणे बाकी आहे, त्यांनी करून घ्यावे, असे मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी सांगितले.
श्रीखंडे म्हणाले, राज्यात सन २०१९-२० पासून पीएम किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई- केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार कार्डशी संलग्न करणे व भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केलेले आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करणार नाही किंवा बँक खाते आधार संलग्न करणार नाहीत, त्यांचे नाव सदर योजनेतून वगळण्यात येणार आहे.
त्यामुळे ई-केवायसी करण्याकरता मे, जून, जुलै व ऑगस्टमध्ये कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही मंगळवेढा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित व काही लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत संबंधित शेतकऱ्यांना वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण करण्याकरता प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थीचे योजनेमधून नाव वगळण्याकरता शासन स्तरावरून सूचना आल्या आहेत. त्यामुळे या लाभार्थीनी तातडीने ही पूर्तता करावी.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज